राज्य शासनाच्या 29 सप्टेंबरच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांबाबत ठोस निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदा ‘वर्षा’ निवासस्थानी सुखाने दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा गिरणी कामगारांनी दिलाय. हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांनी आज आझाद मैदानात आंदोलन केलं. महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून गिरणी कामगार या आंदोलनाला उपस्थित होते. गिरगाव चौपाटीवर असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खरंतर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशांचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे आझाद मैदानात आंदोलनाचा निर्णय गिरणी कामगार संघटनांच्या नेत्यांनी घेतला. आतापर्यंत सुमारे 11 हजार गिरणी कामगारांना घरे मिळाली असून सुमारे पावणे दोन लाख कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहेत. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांना देण्यात येणाऱ्या घरांचा योजनाबद्ध कृती आराखडा तयार करून तो सादर करावा ही कामगारांची प्रमुख मागणी आहे.
COMMENTS