…तर शिवसेनेचे  20-22 आमदार भाजपात जाणार –  रवी राणा

…तर शिवसेनेचे 20-22 आमदार भाजपात जाणार – रवी राणा

मंबई – शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढताच सेनेचे 20 ते 22 आमदार हातातले शिवबंध मातोश्रीवर तोडून वर्षावर दाखल होतील, असा सुचक इशारा अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. नुकतेच शिवसेनेने भाजपला अल्टीमेट दिले असले तरी याचा फटका उलट सेनेलाच बसू शकतो, असे चित्र आहे.

राणा यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले, की शिवसेनेतही फुटीची बिजे रुजत असून, येत्या दसरा मेळाव्याला सेनेचे तीन ते चार आमदार अनुपस्थित राहणार आहेत. ‘शिवसेनेने दसरा मेळाव्यात पाठिंबा काढण्याची घोषणा केली, तरी काही फरक पडणार नाही. कारण आम्ही अपक्ष सहा आमदार देवेंद्र फडणवीसांच्या कामाबाबत सकारात्मक आहोत. इतकेच नाही तर शिवसेनेने पाठिंबा काढला तर सरकार अजिबात अल्पमतात येणार नाही’ सरकारचा पाठिंबा काढाण्यावरून शिवसेनेच्या आमदारांचे दुमत झाल्याचे राणा यांनी बोलताना सांगितले. नुकत्याच झालेल्या मातोश्री येथील बैठकीत आमदार आणि मंत्री यांच्यात खडाजंगी झाली होती. याशिवाय सरकारचा पाठिंबा काढण्याची मागणी काही आमदारांनी केली होती. मात्र सेनेचे काही आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून, त्यांचा पाठिंबा काढण्याला विरोध असल्याची खळबळजनक माहिती आमदार राणा यांनी दिली आहे.

COMMENTS