तुळजापूर यात्रा अनुदान घोटाळा प्रकरणी नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे यांच्यासह तत्कालिन मुख्याधिकारी संतोष टेंगळे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. शासनाकडून दरवर्षी तुळजापूर पालिकेला यात्रा अनुदान दिले जाते. याच अनुदानाच्या रकमेत तब्बल एक कोटी 62 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर 12 आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. शनिवारी (ता. 29) यावर सुनावणी झाली. यामध्ये सर्वच आरोपींचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांनी शासनाच्या वतीने बाजू मांडली. दरम्यान आरोपींचा जामीन नामंजूर केल्याने नगराध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकणाला आता वेगळेच वळण मिळाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे.
Newer Post
अखेर 80 वर्षाच्या आईला मिळाला न्याय !
COMMENTS