उस्मानाबाद – तुळजापूरातील तुळजाभवानी मंदिरात आज पासून पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भाविकांना दररोज दुपारी 12 ते 5 या वेळेत सशुल्क दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक भाविकाला 100 रुपये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी अभिषेक पूजेच्या मार्गाचा वापर करून भक्तांना अभिषेक हॉल मधून दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तुळजा भवानी मंदिरातच्या इतिहासात पहिल्यांदाच असा पेड दर्शनाचा निर्णय झाला आहे. दररोज 5 तास पेड दर्शनाची सोय भक्तांना मिळणार आहे. या पेड दर्शनाच्या सुविधेसाठी दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यन्त चालणाऱ्या अभिषेक पूजा आजपासून सकाळी 6 ते 10 वाजे पर्यंत चालणार आहेत. याच अभिषेक रांगेतून पेड दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रवेश देण्यात येणार आहे. पेड दर्शानाच्या या निर्णयामुळे मंदिराचे दररोज 50 हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
COMMENTS