अमरावती – तूर खरेदीवरून राज्यात रान पेटले आहे. राजकीय पक्षांकडून आणि शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करावी अशी मागणी केली जात आहे. तर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह विभागीय आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
तूर खरेदी सुरू होईपर्यंत आपण आंदोलन बंद करणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्र सध्या बंद करण्यात आले आहे. बाजार समितीमध्ये अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर सध्या विक्रीकरिता पडलेली आहे. ही तूर नाफेडद्वारा लगेच खरेदी करण्यात यावी ही मागणी करत आमदार बचू कडू यांनी आज शेतकऱ्यांसह अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
COMMENTS