राज्यात तूर खरेदी बंद केल्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यातच तूर खरेदी विषयी सरकारचे वेळोवेळी बदलत्या धोरणामुळे शेतक-यांचे अतोनात हाल होत आहेत. शेतकऱ्यासाठी सरकार काहीतरी योजना सुरू करेन याची वाट न पाहता शेतकऱ्याची पोरंच शेतकऱ्यासाठी धावून आली आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 7 मे रोजी भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये तूरडाळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
भोसरीनंतर नगर, कोल्हापूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्याचं नियोजन आहे. शहरी भागात राहणाऱ्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शेतकरीपुत्रांनी मिळून हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे.
तुरीचा हमीभाव, डाळ बनवण्यासाठी येणारा आणि वाहतुकीचा खर्च धरुन डाळीची किंमत ठरवण्यात येणार आहे. तूरडाळ महोत्सवाला स्थानिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी,असं आवाहन शेतकरी सन्मान परिषदेचे आयोजक मोहसीन शेख आणि ब्रह्मा चट्टे यांनी केलं आहे.
COMMENTS