त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो – राजू शेट्टी

त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो – राजू शेट्टी

सोलापूर – भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. राज्यात आणि देशात भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी संघटनांची मोठी मदत झाली. मोदींना शेतीविषयीचे अज्ञान असावे किंवा त्यांनी आम्हाला फसवून सत्ता मिळविण्याचा डाव साधला असावा, अशी आमची आता खात्री पटली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. यापुढे तीव्र आंदोलने करुन सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी शेतकरी संघटनेने काही अटी व शर्ती घातल्या होत्या. यामध्ये उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव कृषी मालाला मिळावा तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागण्या मान्य करण्याच्या अटींवर शेतकरी संघटना राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी झाली होती. मात्र यापैकी कोणतेच आश्‍वासन शासनाने पाळले नाही. त्यामुळे शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडली असल्याची जाहीर कबुली शेट्टी यांनी दिली.

COMMENTS