वडिलांनी आत्महत्या करुन नये म्हणून मुलीने संपविले जीवन, बळीराजाची करूण कहाणी !

वडिलांनी आत्महत्या करुन नये म्हणून मुलीने संपविले जीवन, बळीराजाची करूण कहाणी !

परभणी – वडिलावंर शेतीचं कर्ज होतं. त्यात पाऊस नसल्यामुळे पीकही वाळत जात होती.  उत्पन्नाचे कोणते ही साधन शिल्लक नव्हते. कर्जाच टेन्शनमुळे वडील आत्महत्या करतील, अशी भीती सारिकाच्या मनात होती. त्यामुळे वडिलांनी आत्महत्या करु नये. म्हणून सारिकानेच आपला जीवनप्रवासच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील जवळाझुटा इथे ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्येच्या ठिकाणी तिची सुसाईड नोट आढळली आहे. सारिका झुटे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. सारिका बारावीत शिकत होती. दरम्यान, सारिकाच्या आत्महत्येच्या अगदी सहा दिवस आधी तिचे काका चंडिकादास झुटे यांनी आत्महत्या केली होती. याचा उल्लेख सारिकाने सुसाईड नोटमध्येही केला आहे.

प्रिय पप्पा,
आपल्या भाऊंनी पाच सहा दिवसापूर्वी शेतातील सर्व पीक जळू गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले, तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करु नयेत, यामुळे मी माझे जीवन संपवते.

 

COMMENTS