‘त्या’ अभिनेत्री बेड शेअर करायलाही तयार होतात, केरळच्या खासदाराचं संतापजनक वक्तव्य !

‘त्या’ अभिनेत्री बेड शेअर करायलाही तयार होतात, केरळच्या खासदाराचं संतापजनक वक्तव्य !

तिरुअनंतपुरम् – केरळच्या एका खासदाराने अभिनेत्रींविषयी अत्यंत संतापजनक आणि वादग्रस्त विधान केलं आहे. इनोसेंट वरद थेकेथला असं त्या खासदाराचं नाव आहे. वाईट अभिनेत्री त्यांच्या इच्छेनुसार बेड शेअर करायलाही कमी करत नाहीत असं संतापजनक वक्तव्य त्यांनी केलंय. मल्ल्याळम सिनेमातील कास्टींग काऊच या विषयावर बुधवारी झालेल्या चर्चेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. काही महिला त्यांच्याकडे काही वाईट विचारणा झाली तर त्या लगचे मीडियाकडे जाऊन त्याची वाच्छता करतात किंवा लोकांना त्याबाबत सांगतात. मात्र काही वाईट अभिनेत्री या बेड ही शेअर करायला तयार होतात असं खासदार इनोसंट म्हणाले. खासदार थेकेथला हे मल्ल्याळम् मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

COMMENTS