भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना धक्का, भाऊ राजेंद्र जगताप राष्ट्रवादीत !

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना धक्का, भाऊ राजेंद्र जगताप राष्ट्रवादीत !

पिंपरी चिंचवड – भाजपचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना आज त्यांच्याच बालेकिल्ल्यात जोरदार धक्का बसला. त्यांचे चुलत भाऊ आणि कट्टर समर्थक राजेंद्र जगताप यांनी आपल्या सहका-यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सांगवी परिसरामध्ये राजेंद्र जगताप यांची चांगली ताकद आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपले गुरू अजित पवार यांना जेरीस आणणारे लक्ष्मण जगताप यांना त्यांच्या होमपीचवर धक्का देत राष्ट्रवादीनं लक्ष्मण जगताप यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला.

COMMENTS