मुंबई – एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या 23 प्रवाशांच्या नातेवाईकांचे अश्रूही सुकले नव्हते, तोच स्वतःला मुंबईचे कैवारी म्हणवून घेणारे नेते वेगवेगळं सेलिब्रेशन करण्यात दंग होते. 29 सप्टेंबरच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या गरबा खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. तर त्याच दिवशी महापौर बंगल्यावर परदेशातून आलेल्या ब्राझील फुटबॉल खेळाडूंसाठी मेजवानी ठेवण्यात आली होती. यावर आज महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
एलिफिस्टन्स लोकल दुर्घटना दिवशी फूटबाॅल टीम मला भेट नियोजित होते. परदेशी फूटबाॅल प्लेअर घरी आले, पाहुणे घरी आल्यावर त्याचे आदरातिथ्य केले. पार्टी नव्हती तर स्नॅक्स देण्यात आले होते. असे महापौर म्हणाले. महापौरांनी यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही जोरदार टीका केली. आशिष शेलार मुद्दाम आरोप केले कारण त्याचे खासदार असंवेदनशील दांडिया खेळत होते. तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी शेलारांनी आरोप केले.
“शेलार बिनबुडाचे आरोप करतात. आशिष शेलार दुर्घटनेवेळी कुठे होते, ते मंत्रीमहोदयांच्या स्वागतात मग्न होते. त्यांनी जखमींची चौकशी तरी केली का? पाहुण्यांचं स्वागत करणं ही संवेदनशीलता आहे. ज्यांना यात वावगं वाटतंय त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते,” असंही महापौर म्हणाले.
गरबात नृत्य करणे असंवेदनशील पण घरी पाहुणे जे अाले त्याचे स्वागत करणे संवेदनशीलपणा, काही लोक मात्र यावर राजकारण केले जात आहे.असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.
COMMENTS