महिलांची छेडछाड करणा-यांसाठी धडकी भरवणारी ही बातमी आहे. केरळमध्ये एका महिलेनं तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा-या पुरुषला चांगलाच धडा शिकवला आहे. बलात्कराचा प्रयत्न करणा-या पुरुषाचं तिनं लिंगच कापलं. महिलेच्या या कृत्याचं केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी कौतुक करत तिला साहसी महिला असं संबोधलं आहे. त्या महिलेनंचं पोलिसांमध्ये याविषयीची तक्रार केली आहे. श्रीहरी उर्फ गणेशानं हा त्या महिलेच्या परिवाराचा धर्मगुरु आहे. ती महिला 16 वर्षांची असल्यापासून तो तिच्यावर अतिप्रसंग करायचा. आज सकाळी जेंव्हा तो धर्मगुरू तिच्या घरी आला तेंव्हा त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तेंव्हा चिडलेल्या त्या महिलेने चाकुने त्याचे लिंग कापले. असं त्या महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान 54 वर्षांच्या धर्मगुरू श्रीहरी यांना तिरुअनंतपुरमच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांचं तातडीचं ऑपरेशन केलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.
COMMENTS