सदाभाऊ खोत भाजपमध्ये जाणार ?

सदाभाऊ खोत भाजपमध्ये जाणार ?

सांगली – स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व त्यांचेच सहकारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी गेल्या काही दिवसांत चांगलीच वाढली. त्यामुळे कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्याशी सुप्त संघर्षातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्याबाबतचा प्रस्ताव खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे घेवून जाणार आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होताच सदाभाऊ पक्षप्रवेश करतील. येत्या 29 मे रोजी फडणवीस यांचा इस्लामपूर दौरा निश्‍चित झाला असून त्यावेळीच प्रवेशाची शक्‍यता वर्तवली जात आहे.

 

COMMENTS