नवी दिल्ली – त्रिपुरामध्ये तृणमुल काँग्रेसला आज जोरदार धक्का बसला. तृणमुलच्या सहाही आमदारांनी आज भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत या सहा आमदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला नकार दिला होता. सीपीएमचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही अस सांगत त्यांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलं होतं. त्यामुळे तृणमुल काँग्रेसनं आधीच त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं.
COMMENTS