आपल्या विनोदी शैलीतून विरोधकांवर नेहमी निशाना साधणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा अशाच विधानाने चर्चेत आले आहेत. आठवले यांनी अनुसुचित जाती आणि जमातीसाठी क्रिकेटमध्ये 25 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
इतकंच नव्हे तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची चौकशी करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. पाकिस्तानपेक्षा बलाढ्य संघ असलेल्या भारताचा पराभव कसा झाला याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. या सामन्यात भारताचा १८० धावांनी पराभव झाला होता.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. सरकारने स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घ्यावा, नुकताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली. याच धर्तीवर मागासवर्गीय महामंडळांचेही कर्ज माफ करावे याबरोबरच गोवंश हत्यातून वंश शब्द काढावा, अशा अनेक मागण्यांसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटले.
COMMENTS