दहशतवाद्यांच्या क्रूरतेचा कळस, तुम्ही मनाने खंबीर असाल तरच ही बातमी वाचा !

दहशतवाद्यांच्या क्रूरतेचा कळस, तुम्ही मनाने खंबीर असाल तरच ही बातमी वाचा !

दहशतवादी निष्पापांचा जीव किती सहजपणे घेतात हे आपण पाहिले आहे. एखाद्या अपहरण केलेल्या व्यक्तीला मारहाण करतात त्याला जिवंत मारतात आणि त्याचा व्हिडिओ विविध माध्यमांना पुरवतात. असाच एक अत्यंत क्रूरपणाचा कळस असलेली कहाणी एका इराकच्या खासदारानं सांगितली आहे. इरकाच्या कुर्दीस्तान डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार विआन दाखिल यांनी इजिप्तच्या एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही कहाणी कथन केली आहे. खासदार विआन दाखिल या आयसीस संघटनेच्या दहशतवादाला बळी पडलेल्या मुलींसाठी काम करतात. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या काही महिलांची करुण कहणी त्यांनी सांगितल्या. त्यामध्ये एका महिलेला आणि तिच्या एक वर्षाच्या चिमुकल्याला दहशत वाद्यांनी एका घरात डांबून ठेवलं होतं. तिला तीन दिवस जेवायला दिलं नाही. तिस-या दिवशी तिला भात आणि मांस खायला दिलं. भूकेल्या महिलेनं ते गपागपा खाल्लं. तिचं खावून झाल्यानंतर दहशतवाद्यांनी तिला ते मांस तुझ्या 1 वर्षाच्या मुलाचं होतं असं सांगितलं. अशा अनेक घटना विआन दाखिल यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितल्या आहेत.

COMMENTS