पुणे – दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 88.74 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी च्या निकाला च्या तुलनेत यंदा 0.82 टक्के ने निकाल कमी लागला आहे. यंदाच्या निकालातही मुंलीनीच बाजी मारली आहे. कोकण सर्वाधिक – 96.18 निकाल लागला आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी 83.67 % निकाल लागला आहे. राज्यातील 3676 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे तर 32 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे.
दहावी निकालाची वैशिष्टय
१) दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.८२ % घसरला
२) १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के
३) ४८,५७० विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक मार्क
४) दहा विषयांचा निकाल १०० टक्के
५) ३९०३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स सवलत
६) 81 हजार विद्यार्थ्यांना कसा कोट्यातून सवलत
७) मुलींची बाजी
८) कोकण टाॅपवर तर नागपूर तळाला
कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल यावर नजर टाकूयात….
पुणे – 91.95 %
नागपूर – 83.67 %
औरंगाबाद – 88.15%
मुंबई – 90.09 %
कोल्हापुर -93.59%
अमरावती – 84.35%
नाशिक – 87.76%
लातूर – 85.22 %
कोकण – 96.18%
COMMENTS