राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीचे वेळापत्र जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा ही १ मार्च ते २४ मार्चपर्यंत चालणार आहे तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत चालणार आहे.
गेल्या वर्षी पेपर सुरु होण्याआधी काही मिनिटे तो व्हॉटसअॅपवर व्हायरल झाला होता या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थ्याला परीक्षागृहात प्रवेश मिळणार नाही तसेच पेपर संपेपर्यत बाहेरही जाता येणार नाही असा शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे तसेच परीक्षा काळामध्ये पर्यवेक्षकांना मोबाईलबंदीही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्याच्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि कोकण ह्या ९ विभागीय मंडळांच्या मदतीने महाराष्ट्र राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा घेत असते. मंडळातर्फे वर्षातून दोन वेळा ह्या परीक्षा घेतल्या जातात. मुख्य परीक्षेच्या उच्च माध्यमिक शालान्त अभ्यासक्रमासाठी साधारणपणे १४ लाख विद्यार्थी आणि माध्यमिक शालान्त अभ्यासक्रमासाठी १७ लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. जुलैमध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी एकत्रितपणे साधारण ६ लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात.महाराष्ट्रामध्ये सुमारे २१ हजार माध्यमिक शाळा व ७ हजार उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
COMMENTS