शरद पवार आणि राहुल गांधी राज्य सरकारवर एकत्र हल्लाबोल करणार ?

शरद पवार आणि राहुल गांधी राज्य सरकारवर एकत्र हल्लाबोल करणार ?

मुंबई – नागपूरमधील हिवाळी अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी आणि शेतमालाच्या भावावरुन सरकारला घेऱण्यासाठी येत्या 12 डिसेंबरला हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष या विरोधकांच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हेही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

दरम्यान या मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आमंत्रण दिलंय. मात्र त्यांच्याकडून अजून होय किंवा नाही असा निरोप आलेला नाही. गुजरात निवडणुकीचा दुसरा टप्पा 14 तारखेला संपतोय. त्यामुळे राहुल गांधी कितपत येतील याबाबत साशंकता आहे. मात्र राहुल  गांधीचा आल्यास शरद पवार आणि राहुल गांधी हे एकत्र हल्लाबोल आंदोलनात सहभागी होतील. असं झाल्यास विरोधकांच्या मोर्चाला अधिक धार येणार आहे. आगामी राजकारणाची दिशाही बदलण्याची शक्याता आहे.

COMMENTS