निवडणूक आयोगाकडून अनंतनागमधील पोट निवडणूक रद्द

निवडणूक आयोगाकडून अनंतनागमधील पोट निवडणूक रद्द

नवी दिल्ली –सध्या काश्‍मीरमध्ये निवडणूक करण्यासारखे वातावरण नसल्याने अनंतनाग येथे 25 मे रोजी होणारी पोट निवडणूक रद्द करण्यात येत आहे. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

पाकिस्तान सोमवारी आर्मीने सीमारेषा ओलांडून दोन भारतीय जवानांचे शिर कलम केले. तर, दुसरीकडे दहशतवाद्यांनी कॅश व्हॅनवर हल्ला केला. यात 5 पोलिस जवान शहीद झाले. बॅंकेचे दोन अधिकारीही यात मारले गेले.

श्रीनगरमध्ये 9 एप्रिल रोजी झालेल्या पोट निवडणुकीदरम्यान हिंसाचार भडकला होता. यात 8 जण मारले गेले होते. त्या दिवशी सीआरपीएफच्या जीपवर एका काश्‍मीरी युवकाला बांधल्याचे समोर आले होते. सीआरपीएफने तो पत्थरबाज असल्याचे म्हटले होते. सोबतच तसे केले नसते तर दगडफेक करणाऱ्या जमावाने जवानांना लक्ष्य केले असते, असाही दावा पोलिसांनी केला होता.

COMMENTS