गाईचं नाही तर म्हशीचं मटण खाल्लं, काजोलचं स्पष्टीकरण

गाईचं नाही तर म्हशीचं मटण खाल्लं, काजोलचं स्पष्टीकरण

बॉलिवूडची अभिनेत्री काजोल हिनं तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन उठलेलं वादळ आता थांबण्याची शक्यता आहे. ज्या व्हिडिओवरुन वाद सुरू झाला होता. तो व्हिडओच काजोलनं तिच्या फेसबूक अकाऊंटवरुन काढून टाकला आहे. तसंच आपण बीफ नाही तर म्हशीचं मटण खाल्लं असं स्पष्टीकरणही तिनं दिलं आहे. काजोलनं तिच्या फेसबूक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये तीनं आपण बीफ खाल्ल्याचं म्हंटलं होतं. त्यानंतर तिच्यावर सोशल मीडियातून चौफेर टीका झाली. देशात बीफ खाण्याला आणि गाईची हत्या करण्याला बंदी असतना काजोलने बीफ कसे खाल्ले असा सवाल तिला विचारण्यात आला. याचा वाद खूपच वाढू लागल्यामुळे तिनं तो व्हिडिओ काढून टाकला असून म्हशीचं मटण खाल्लं असं स्पष्टीकरणही दिलं आहे.

COMMENTS