दिल्ली पोटनिवडणुकीत कमळ कोमेजले, आम आदमी पार्टीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी !

दिल्ली पोटनिवडणुकीत कमळ कोमेजले, आम आदमी पार्टीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी !

दिल्ली – एकीकडे गोव्यात दोन्ही जागा आरामात जिंकलेल्या भाजपला राजधानी दिल्लीत मात्र जोरदार फटका बसला आहे. दिल्लीतल पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचे उमेदवार राम चंदर हे 24052  मतांनी जिंकले आहेत. त्यांना 59886 मते मिळाली. तर भाजपचे वेद प्रकाश हे दुस-या क्रमांकवर राहिले असून त्यांना 35834 मते मिळाली. तर काँग्रेसचे सुरेंद्र कुमार हे तिस-या क्रमांकवर फेकले गेले आहेत. त्यांना 31919 मते मिळाली.

28 पैकी तब्बल 21 फे-यांमध्ये भाजप तिस-या क्रमांकवर फेकला गेला होता. मात्र 22 व्या फेरीत भाजप उमेदवारानं काँग्रेसच्या उमेदवारावर आघाडी घेत दुसरा क्रमांक पटकावला. शेवटपर्य़ंत तो टिकवलाही.  काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली महागनर पालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं. त्यामुळे ही जागा भाजप जिंकेल असं बोललं जातं होतं. भाजपचे उमेदवार वेद प्रकाश हे पूर्वी आम आदमी पार्टीचे उमेदवार होते. पक्षात मतभेद झाल्यानं त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. तरीही त्यांना पराभव स्विकरावा लागला आहे.

COMMENTS