दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार फटका, आम आदमी पार्टीची मोठी आघाडी !

दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार फटका, आम आदमी पार्टीची मोठी आघाडी !

दिल्ली – एकीकडे गोव्यात दोन्ही जागा आरामात जिंकलेल्या भाजपला राजधानी दिल्लीत मात्र जोरदार फटका बसला आहे. आतापर्यंत 22 फे-यांची मतमोजणी पूर्ण झाली असून 21 फे-यापर्यंत तिस-या क्रमाकावर असलेल्या  भाजपचा उमेदवार आता दुस-या क्रमांकवार आला आहे. तर काँग्रेसचा उमेदवार तिस-या क्रमांकवार फेकला गेला आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार राम चंदर यांना आतापर्यंत 51070 मते मिळाली आहेत. काँग्रेसचे सुरेंद्र कुमार यांना 28126 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या वेद प्रकाश यांना 29595 मते मिळाली आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली महागनर पालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं. त्यामुळे ही जागा भाजप जिंकेल असं बोललं जातं होतं. भाजपचे उमेदवार वेद प्रकाश हे पूर्वी आम आदमी पार्टीचे उमेदवार होते. पक्षात मतभेद झाल्यानं त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. तरीही त्यांना पराभव स्विकरावा लागला आहे.

आंध्रप्रदेशातील पोटनिवडणुकीत वायएसआर काँग्रेसला झटका बसला आहे. तिथून टीडीपीचा उमेदवार मोठ्या मतांच्या आघाडीवर आहे. तिथेही वायएसआरच्या आमदाराने राजीनामा देऊन टीडीपीमध्ये प्रवेश केला होता.

COMMENTS