दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश आले आहे. भाजपच्या यशामुळे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. सध्याच्या स्थितीत भाजने 175 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने प्रत्येकी 43 जागांवर आघाडी घेतली आहे. तर अन्य 3 जागांवर आघाडीवर आहेत. एक्झिटपोलमध्येही भाजपला मोठा विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला प्रत्येकी 25 पेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज मात्र खोटा ठरताना दिसत आहे.
COMMENTS