पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची कार्यकारिणी बैठक

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची कार्यकारिणी बैठक

पिंपरी  – भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली आहे. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. 

 

पिंपरी-चिंचवडमध्ये 1982 ला भाजप कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यानंतर तब्बल 35 वर्षांनी शहरात भाजपची बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देत भाजप पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्तारुढ झाली असून संपूर्ण शहर भाजपमय झाल्याचे चित्र आहे. नारायण राणे यांच्या भाजपच्या प्रवेशाबद्दल सध्या जोरदार चर्चा असल्याने या कार्यकारिणीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

 

COMMENTS