दिल्ली – दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मुख्य लढत ही भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात असली तरी अनेक पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही 46 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काल पक्षाच्या वतीनं दिल्ली महापालिकेसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या कार्यक्रमाला पवार यांच्याशिवाय, राष्ट्रवादीचे लोकसभेतील गटनेते तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष रमेश गुप्ता उपस्थित होते. दिल्ली पालिकेत एकूण 272 जागांसाठी मतदान होणार आहे. शिवसनेही दिल्ली महापालिकेसाठी आपले नशीब अजमावणार आहे. दरम्यान समाज समाजवादी पार्टीही या निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे करणार आहे. पक्षाने 29 उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीतर्फेत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि खासदार डिंपल यादव हे स्टार प्रचारक असणार आहेत.
COMMENTS