PMPML च्या 27 बसमार्ग बंद करण्यास विरोध

PMPML च्या 27 बसमार्ग बंद करण्यास विरोध

धडाडीचे अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलची सूत्र हाती घेल्यानंतर निर्णयाचा धडाका सुरू ठेवला आहे. मात्र या निर्णयामुळे त्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. पीएमपीच्या काही मार्गांवर उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देऊन कोणतीही पूर्वसूचना न देता 27 मार्गांवरील 38 बस बंद केल्याचा आरोप पीएमपीएल प्रवासी मंचने केला आहे. 

​पीएमपीची बससेवा नफ्यासाठी नसून, प्रवाशांच्या सेवेसाठी असल्याने तुकाराम मुंढे यांनी प्रवासी केंद्रीत विचार करावा, अशी मागणीही प्रवासी मंचातर्फे करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी इतर चांगले निर्णय घेतले त्याचे स्वागत करतो, पण चालू मार्ग बंद करू नये, अशी मागणी प्रवासी मंचाने केली आहे.

दरम्यान,  स्वारगेट, महात्मा फुले मंडई, डेक्कन, पुणे स्टेशन, शनिवारवाडा अशा मध्यवर्ती ठिकाणांहून सुटणाऱ्या फेऱ्याही बंद करण्याच्या विचारत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यांची गर्दी टाळण्यासाठी अनेक नागरिक पीएमपीएमएलला प्राधान्य देतात. मात्र, मार्ग बंद केल्याने मध्यवर्ती भागात वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे. त्यामुळे असा निर्णय झाला असेल तर, तो निर्णय रद्द करावा, अशी मागणी प्रवासी मंचाने केली आहे.

 

COMMENTS