दिल्ली विद्यापीठात काँग्रेसच्या ‘एनएसयूआय’चा ‘एबीव्हीपी’ला दे धक्का!

दिल्ली विद्यापीठात काँग्रेसच्या ‘एनएसयूआय’चा ‘एबीव्हीपी’ला दे धक्का!

नवी दिल्ली –  दिल्ली विद्यापीठात काँग्रेसशी संबंधित असलेल्या एनएसयूआयने निवडणुक जिंकली आहे. तर भाजपाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदासह तीन जागांवर एनएसयूआयने विजय मिळवला असून अध्यक्षपदी एनएसयूआयच्या रॉकी तूशीदची निवड झाली आहे.

मंगळवारी पार पडलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत एकूण 43 टक्के मतदान झाले होते. दिल्ली विद्यापीठात मागच्यावर्षी निकालाच्या उलटा यावर्षी निकाल लागले आहे. मागच्यावर्षी एबीवीपीने 3 जागा तर, एनएसयूआयने संयुक्त सचिवपदाची एकमेव जागा जिंकली होती. यावर्षी एबीवीपीला सचिवपदाची एकमेव जागा जिंकता आली आहे.

 

 

 

COMMENTS