दिल्‍लीत शिवसेनेच्या 56 पैकी 55 उमेदवारांची डिपॉझिट जप्त

दिल्‍लीत शिवसेनेच्या 56 पैकी 55 उमेदवारांची डिपॉझिट जप्त

दिल्ली महापालिकेवर भाजपने तिसऱ्यांदा झेंडा फडकावला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.दिल्‍लीच्या तख्‍तासाठी रिंगणात उतरलेल्या शिवसेनेलाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. निवडणुकीत शिवसेनेच्या 56 उमेद्‍वारांपैकी 55 जणांची डिपॉझिट जप्त  झाली आहे.

दिल्लीच्या तिन्‍ही महापालिकांच्या आखाड्यात 2 हजार 516 उमेदवार उतरले होते. यापैकी जवळपास 70 टक्के म्हणजे 1,790 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आहे. यामध्ये आपच्या 40, तर काँग्रेसच्या 92 उमेदवारांचा समावेश आहे.   यात भाजपच्याही 5  उमेदवारांतचा समावेश आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या बसपच्या सर्वाधिक 192 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. तर जदयूच्या 94 आणि शिवसेनेच्या 55 उमेदवारांवर डिपॉझिट  रक्कम जप्त होण्याची वेळ आली आहे.

 

COMMENTS