काँग्रेसचा 10 आमदारांचा गट भाजपच्या संपर्कात – दानवे

काँग्रेसचा 10 आमदारांचा गट भाजपच्या संपर्कात – दानवे

पिंपरी- चिंचवड –  काँग्रेसमधील 10 आमदारांचा गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये राज्य कार्यकारणीच्या समारोपाच्या भाषणात त्यांनी हा दावा केलाय. खरंच काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत की दानवेंनी असेच पिल्लू सोडले आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. जर असतील तर ते कोणते याबाबतही तर्क वितर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राणेंसोबत काँग्रेसचे 10 आमदार भाजपात येणार का अशीही चर्चा सुरू आहे. मात्र महापॉलिटिक्सला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणे यांच्यासोबत एवढा मोठा गट भाजपमध्ये जाणार नाही. फारतर दोन किंवा तीन आमदार राणेंसोबत जाऊ शकतात अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

COMMENTS