देशातील 100 हून अधिक पूल केव्हाही कोसळू शकतात – नितीन गडकरी

देशातील 100 हून अधिक पूल केव्हाही कोसळू शकतात – नितीन गडकरी

नवी दिल्ली – देशातील 100 हून अधिक पूल केव्हाही कोसळू शकतात. अशी धक्कादायक माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज संसदेत दिली.  याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असे ही ते म्हणाले. लोकसभेत गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात नितीन गडकरी यांनी देशातील पुलांच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली.

केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात देशभरातील 1 लाख 60 हजार पुलांचे सेफ्टी ऑडीट केले. यामध्ये 100 हून अधिक पूल कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे समोर आले असे गडकरींनी सांगितले. धोकादायक अवस्थेतील हे 100 पूल कधीही कोसळतील अशा अवस्थेत असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी 2 ऑगस्ट 2016 मध्ये तब्बल 42  जणांचे जीव घेणाऱ्या महाड पूल दुर्घटनेचाही गडकरींनी यावेळी उल्लेख केला. महाडसारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गेल्या वर्षीपासून सरकारने देशभरातील पुलांची माहिती गोळा करुन सेफ्टी ऑडीटचे काम हाती घेतले असे त्यांनी सांगितले.

 

COMMENTS