बारामती – सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ अशी गर्जना करणा-या भाजप सरकारने तीन वर्ष झाली तरी आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही. आता तर फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी आरक्षणाबाबत फारशी आशा राहिलेली नाही असं त्यांच्या वक्तव्यावरुन दिसून येतंय. थोडक्यात काय तर फडणवीस सरकार आपल्याला सहजासहजी आरक्षण देणार नाही असंच ग्रामविकास मंत्री राम शिंदे यांनी सुचवलंय. एक प्रकारे आपली हतबलताच मंत्रीमहोदयांनी व्यक्त केलीय. बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात आरक्षणासाठी सर्व पक्षातील धनगर नेत्यांनी एकत्र यायला हवं, आपलं उपद्रवमुल्य आणखी वाढवायला हवं तरच आपल्याला आरक्षण मिळेल असं सांगत एक प्रकारे ग्रामविकास मंत्री राम शिंदे यांनी फडणवीस सरकारवर तोफ डागली. पाहूयात काय म्हणाले राम शिंदे….
COMMENTS