धर्म मानू नका, अन्यथा हकालपट्टी, वाचा कोणी दिला पक्ष कार्यर्त्यांना इशारा !

धर्म मानू नका, अन्यथा हकालपट्टी, वाचा कोणी दिला पक्ष कार्यर्त्यांना इशारा !

चीनच्या कम्युनीस्ट पक्षानं त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना अजब फतवा काढला आहे. जे कार्यकर्ते धर्माला मानतात त्यांनी एक तर शिक्षा भोगण्यास तयार व्हावे किंवा त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशाराच पक्षानं दिला आहे. चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सने हे वृत्त दिले आहे. खरतंर चीनच्या घटनेने नागरिकांना त्यांच्या मताप्रमाणे धर्म मानण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. तरीही कम्यनिस्ट पक्षाने मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी धर्म मानू नये, नास्तिक बनावे असा फतवा काढला आहे. देशाबाहेरील काही शक्ती देशात धर्मावरुन फूट पाडू इच्छित आहेत. त्यामुळे देशाला धोका पोहचू शकतो असं चीनच्या कम्युनीस्टांचा तर्क आहे.

COMMENTS