सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण, तीन दिवसात तपास अहवाल द्या – दिल्ली हायकोर्ट

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण, तीन दिवसात तपास अहवाल द्या – दिल्ली हायकोर्ट

दिल्ली – सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल येत्या तीन दिवसांत सादर करा असा आदेश दिल्ली हायकोर्टानं या प्रकरणाचा तपास करणा-या दिल्ली पोलिसांना दिला आहे. याचिकाकर्ते भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनाही हा अहवाल द्यावा असा आदेश कोर्टानं दिला आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे. कोर्टाच्या देखरेखीखाली हा तपास व्हावा अशी मागणी करणारी याचिका स्वामी यांनी केली होती. सुनंदा पुष्कर या काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी आहेत. 17 जानेवारी 2014 मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये आढळून आला होता.

COMMENTS