धुळ्याचे माजी खा. शिवाजीराव पाटील यांचे निधन

धुळ्याचे माजी खा. शिवाजीराव पाटील यांचे निधन

धुळे – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनीक आणि धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे आज (शनिवारी) पहाटे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.पाटील यांना  महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री, आमदार राहिलेले पाटील शिवाजीराव पाटील एक टर्म राज्यसभेचे खासदारही होते. 2013 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.  तरूण वयातच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेले पाटील, स्वातंत्र्यानंतर राजकारणात आले. शिवारीजराव पाटील हे दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील आहेत.

शिवाजीराव  पाटील यांच्या कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी असा  त्यांचा राजकीर प्रवास राहीला. 1960 ते 1967 या काळात ते महाराष्ट्र विधानपरिषदत आमदार होते. तर, 1967 ते 1980 आसा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे आमदार होते. 1967, 1972 आणि 1978 अशा सलग तीन निवडणूका त्यांनी जिंकल्या. राज्याला आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे योगदान देणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यात विविध खात्याचे मंत्रिपदही भूषवले. साखर क्षेत्रातील सहकारी चळवळीतही ते सक्रीय होते. 1992 ते 1998 अशी एक टर्म ते राज्यसभेचे खासदार होते.

COMMENTS