धुळे – धुळ्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. माधुरी बोरसे यांनी आज मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. माधुरी बोरसे या मितभाषी असल्यामुळे धुळे शहरातील शिवसेनेच्या सर्व गटांशी त्यांचा चांगला समन्वय होता. शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण राज्यात हजारो डॉक्टरांचे चांगले संघटन उभारले होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भाभरे, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बोरसे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
COMMENTS