मुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्‍टीचा इशारा; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्‍टीचा इशारा; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई- मुंबईसह ठाणे शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रस्‍ते, रेल्‍वे, विमान वाहतूक सेवा कोलमडली आहे. अजूनही पाऊस सुरूच असून आगामी 24 तासात मुंबई शहर व उपनगांत अतिवृष्‍टीचा इशारा देण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

येत्या 48 तासांत मराठवाड्यात मुसळधार

येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात येत्या 48 तासांत मराठवाड्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्‍य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि नॉर्थ ईस्टच्या काही भागातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

COMMENTS