धोनीची खासगी माहिती लीक; साक्षीचा मंत्र्यांवर संताप

धोनीची खासगी माहिती लीक; साक्षीचा मंत्र्यांवर संताप

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची खासगी माहिती केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे धोनीची पत्नी साक्षी हिनं माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

 

धोनीची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा आधार कार्डच्या प्रमोशन कार्यक्रमात प्रकार घडला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन धोनीच्या आधार कार्डची कॉपी ट्वीट करण्यात आली. त्यानंतर प्रायव्हसी नावाचा काही प्रकार आहे का, असा प्रश्न ट्विटवरून साक्षीने रवीशंकर प्रसाद यांना केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे लोक धोनीच्या घरी जाऊन, तो आधार कार्डचा वापर कसा करतो, त्याची माहिती अपडेट करत होते. अशाच एका ट्वीटमध्ये धोनीचा आधार कार्ड फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला. ज्यावर साक्षीने आक्षेप घेतला.

 

या कारभारामुळं धोनीची पत्नी संतापली आणि तिनं थेट केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री रवीशंकर प्रसाद यांना टॅग करून ट्विट केले. ‘खासगीपणा नावाची काही गोष्ट आहे की नाही? आधार कार्डसाठी भरलेला अर्जही सार्वजनिक केला जातो म्हणजे काय?,’ असा सवाल तिनं केला. रवीशंकर प्रसाद यांनी त्या ट्विटला तात्काळ उत्तर देऊन आपली काही खासगी माहिती उघड झाली आहे का?,’ अशी विचारणा केली.यावर साक्षीने आधार कार्ड फॉर्ममध्ये खासगी माहिती भरलेली आहे. तो फॉर्म अपलोड करण्यात आल्याचे सांगितल्यानंतर प्रसाद यांनी याची तातडीने दखल घेत ट्विट हटवण्यास सांगितले. तसेच हा प्रकार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले.

COMMENTS