शिवसेनेच्या 20 नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. पक्षाने एकाच व्यक्तीला अनेक पद दिल्याने नाराज नगरसेवकांनी राजीनामे दिल्याची सुत्रांची माहिती आहे.
सेनेचे नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना सभापती पद देण्यावरून अनेक नगरसेवक नाराज आहेत. एकाच व्यक्तीला अनेक पद देण्यावरून ही नाराजी आहे. विजय चौगुले यांनी पक्ष वाढीसाठी एकही काम केले नाही. तसेच इतरांनाही संधी मिळावी, अशी नाराज नगरसेवकांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान, मे महिन्यात स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आहे. गेल्या वेळी स्थायी समितीमध्ये शिवसेनेला काँग्रेसची साथ मिळाल्यामुळे सेनेकडे स्थायी समिती सभापती पद मिळाले होते. स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 8 , शिवसेना 6 , काँग्रेस 1, भाजप 1 असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, नवी मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या नाराजीमुळे शिवसेनेला पुन्हा हे पद मिळणार नाही, अशी चर्चा सुरू आहे.
COMMENTS