नवी मुंबई महापालिका ठरली सर्वात श्रीमंत महापालिका !

नवी मुंबई महापालिका ठरली सर्वात श्रीमंत महापालिका !

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे या अ आणि ब वर्गांच्या महापालिकांना मागे टाकत राज्यातील मुंबई महापालिका वगळता सर्वात श्रीमंत महापालिका बनली आहे. ही महानगरपालिका काटकसर आणि आर्थिक नियोजन केल्याने 2 हजार कोटींची ठेवी असणारी श्रीमंत महापालिका ठरली आहे.

जोरदार करवसुली करुन आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने राज्यातील श्रीमंत महापालिका होण्याचा मान मिळवला आहे. या महापालिकेसमोर काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच महापालिकेवर 1500 कोटींच्या कामांचा बोजा पडला होता. पण गेल्या दीड वर्षात शहरातील अनावश्यक कामं बंद करुन काटकसर करत वसुलीवर भर दिल्याने महापालिका 2 हजार कोटींच्या ठेवीवर पोहोचली आहे.

 

COMMENTS