विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना येणार एकत्र ? 

विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना येणार एकत्र ? 

मुंबई –  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एक जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. या विधानपरिषद निवडणुकीसाठी नवी समीकरणे जुळवण्याची शक्यता आहे. भाजपा आणि मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हं आहेत.

 सर्व सहमतीने अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी आहेत. अपक्ष उमेदवार उभा करून त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पाठिंबा देण्याच्या तयारी आहे. भाजपाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार उभा करण्यासाठी तीनही पक्षांमध्ये गुफ्तगू सुरू आहे.

 

COMMENTS