नवी मुंबई – नवी मुंबई स्थायी समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुभांगी पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार ऋचा पाटील यांचा 9 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला होता. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीची 8 मते आहेत. तर काँग्रेसचं एकमत आहे. शिवसेना 6 आणि भाजपचं एक मत आहे. राष्ट्रवादीच्या शुभांगी पाटील यांना राष्ट्रवादीची 8 आणि काँग्रेसचं एक अशी 9 मतं मिळाली तर शिवेसनेच्या ऋचा पाटील यांना शिवसेनेची 6 तर भाजपचं एक अशी 7 मतं मिळाली होती. गेल्यावर्षी स्थायी समितीचं अध्यक्षपद शिवसेनेकडं गेलं होतं. काँग्रेसच्या उमेदवारानं शिवसेनेला मदत केली होती. यावेळी मात्र वरीष्ठ पातळीवरुन हालचाली झाल्या आणि काँग्रेसंच मत अखेर राष्ट्रवादीच्य पारड्यात पडलं.
COMMENTS