मोदींकडून मॅन्चेस्टर बॉम्बस्फोट हल्लाचा निषेध

मोदींकडून मॅन्चेस्टर बॉम्बस्फोट हल्लाचा निषेध

लंडन – ब्रिटनच्या मॅन्चेस्टरमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या हल्लात 20 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मॅन्चेस्टर एरिना सभागृहात प्रसिद्ध गायिका अरियाना ग्रॅण्ड यांच्या कॉन्सर्टवेळी हा हल्ला झाला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मॅन्चेस्टर एरिना सभागृहात एक कॉन्सर्ट सुरु होते. या कॉन्सर्टमधील गायिका अरियाना ग्रांडेचे शेवटचे गाणे सुरु असताना हे स्फोट झाले. यात 20 जणांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर या भागात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान हल्ल्या नंतर झालेल्या धावपळीतही अनेक जण जखमी झाल्याचं समजतंय. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.

COMMENTS