नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा, भाजपात जाणार!

नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा, भाजपात जाणार!

नांदेड – नांदेडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राजीनामा मातोश्रीवर पाठवला असून युवासेना जिल्हाध्यक्ष माधव पावड़े यांनी ही राजीनामा दिला आहे.

नांदेडमध्ये शिवसेना पदाधीकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र सुरु आहे. महापालिकेत आतापर्यत 9 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहे. कॉंग्रेस 4, सेना 3, राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांनी राजीनामे दिले असून हे  सर्वजन भाजपात जाणार आहे. महापलिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे.

COMMENTS