नागपूर : काँग्रेसला मोठा धक्का,  बड्या नेत्यांसह 250 कार्यकर्ते भाजपात

नागपूर : काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्यांसह 250 कार्यकर्ते भाजपात

नागपूर – नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे तीन माजी नगरसेवक आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव ममता गेडाम यांच्यासह तब्बल अडीचशे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर सोमवारी आयोजित कार्यक्रमात या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपात प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये 62 जण काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

गटबाजीमुळे आणि सतत कार्यकर्त्यांना कोणत्याही निर्णयातून डावलले जात असल्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका गार्गी चोप्रा यांचे पती माजी नगरसेवक प्रशांत चोप्रा, माजी नगरसेविका सुमन मिश्रा, माजी नगरसेवक संजय मोहोड, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव ममता गेडाम यांच्यासह अडीचशे कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

या नेत्यांनी काँग्रेसला नागपुरात कुठलेही भवितव्य राहिलेले नसल्याचे सांगितले. एकूणच नागपूर शहरात काँग्रेस पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे.

 

 

COMMENTS