नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिठ्ठीनंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?

नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिठ्ठीनंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?

नारायण राणे यांनी काँग्रेसला आज सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पुढील वाटचालीसाठी राणे यांना शुभेच्छा दिल्यात. ‘राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्याचे आताच कळाले,’ अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 
चव्हाण म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पक्ष सोडल्याचे आताच समजले. त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आता केलेले सर्व आरोप तथाकथित आहेत.’ राणेंच्या आरोपांविषयी अधिक बोलणे चव्हाण यांनी टाळले आहे.

COMMENTS