काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपात येणार आहे की नाही, याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील. याबाबत लवकरच कळेल, असे सुचक वक्तव्य राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
डोंबिवलीच्या शोभायात्रेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण सहभागी झाले होते. मराठी नववर्षाच्या आजच्या दिवशी शत:प्रतिशत भाजप होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची पावले पडावी अशी प्रार्थना आम्ही करतोय असे चव्हाण एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.
नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील का ? असा प्रश्न विचारला असता चव्हाण म्हणाले की, नारायण राणे येणार आहे की नाही येणार याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ मंडळी घेतील. राणेंच्याबाबतीत लवकरच काही कळेल तसेच शिवसेना आणि भाजपची युती अभेद्य आहे. आम्ही आमचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
COMMENTS