शिवसेनेकडून विमान कंपन्याविरोधात हक्कभंग दाखल

शिवसेनेकडून विमान कंपन्याविरोधात हक्कभंग दाखल

शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांना विमान प्रवासाचे तिकीट रद्द केल्याने शिवसेनेकडून लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज (मंगळवार) लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.

खासदार गायकवाड यांना पाच विमान कंपन्यांकडून विमान प्रवास बंदी घालण्यात आली. तसेच त्यांचे तिकीटही रद्द करण्यात आले होते. विमान कंपन्यांनी अशाप्रकारे कारवाई करणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित विमान कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. खासदार गायकवाड यांना विमान प्रवासात बंदी घातल्याने त्यांच्या या बंदीविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला.

काय आहे प्रकरण?
पुण्याहून दिल्ली प्रवास करताना इकॉनॉमिक आणि बिझनेस क्लासच्या सीटवरुन खासदार गायकवाड आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यात वाद झाला होता. यानंतर रवींद्र गायकवाडांनी त्या कर्मचाऱ्याला चप्पलेनं मारहाण केली. यानंतर सर्व विमान कंपन्यांनी मिळून रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवाशांच्या यादीतून काळ्या यादीत टाकलंय.

सध्या शिवसेना खासदाराच्या या वर्तनावर सोशल मिडियातूनही खूप काही बोललं जात आहे. शिवसेना खासदारावर अनेक जोक्स, मेसेजेस व्हायरल झाले आहेत. खासदाराच्या या वर्तणुकीवर टीका केली जात आहे. आता या खासदारवरील विमान कंपन्यांनी घातलेली बंदी उठवली जाते की कायम ठेवली जाते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS