नारायण राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्टरवरुन ‘काँग्रेस’ गायब !

नारायण राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्टरवरुन ‘काँग्रेस’ गायब !

सिंधुदुर्ग –  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे. राणे सद्या तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी मनाने काँग्रेस कधीच सोडली आहे अशी चर्चा आहे. त्यालाच पुष्टी देणारी पोस्टर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकणी माणूस आपल्या गावी कोकणात मोठ्या संख्येनं येतो. त्यामुळे साहजिक राजकीय नेत्यांकडून दरवर्षी त्यांच्या स्वागताची पोस्टर लावली जातात. यंदा नारायण राणे यांची लावलेली पोस्टर सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवरुन काँग्रेसचं चिन्हं आणि काँगेसचे नेतेही गायब आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

COMMENTS