बाबासाहेब पुरंदरेंनी घेतली पंतप्रधानांची भेट !

बाबासाहेब पुरंदरेंनी घेतली पंतप्रधानांची भेट !

नवी दिल्ली – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टी कार्यक्रमाच्या आमंत्रणासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी मोदींना कवडीची माळ व पगडी भेट दिली. नरेंद्र मोदी यांनी दोघांच्या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत.

यावेळी बाबासाहेब पुरंदरेंनी मोदींना मराठा सरदारांची प्रतिकात्मक पगडीही भेट दिली. तसेच या पगडी बरोबरच एक शेला व तुळजा भवानीचे प्रतिक असलेली कवड्यांची माळही भेट दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे मोठे योगदान आहे. यावेळी पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत पुरंदरेंनी केलेल्या कार्याची आवर्जून प्रशंसा केली.

COMMENTS